सामाजिक न्यायमंत्री उद्या साधणार जनतेशी संवाद

Foto

औरंगाबाद- सामाजिक न्याय विभागाने मागील चार वर्षाच्या कालावधीत घेतलेल्या निर्णयासंदर्भात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे राज्यातील नागरिकांशी, विद्यार्थ्यांशी, सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचाऱ्यांसमवेत 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता लाइव्ह संवाद साधणार आहेत, असे सहायक आयुक्त शिवाजी शेळके यांनी कळविले आहे.

शासनाने सामाजिक न्याय विभागामार्फत मागील चार वर्षात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णय, राबविलेल्या योजना या संदर्भात इ-लाइव्ह संवाद साधतील.  या उपक्रमाकरीता निवासी शाळा, वसतिगृहे, सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त सर्व आस्थापनांनी सहभागी व्हावे.  या संवादाचे http://elearning.parthinfotech.in या लिंकवरून थेट प्रसारण होणार आहे. तसेच ज्या व्यक्तींना, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारावयाचे असतील त्यांनी 8384858685 या मोबाइल क्रमांकावर व्हाटसअपद्वारे प्रश्न विचारावेत, असेही त्यांनी कळविले आहे.